Photo Gallery : एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये ५० चित्रकारांच्या विशेष कलाकृतींचे चित्रप्रदर्शन

0

नाशिक | कॅन्सर ग्रस्त बालकांच्या उपचारसाठी निधीसंकलनाच्या उद्देशाने नाशिक जिल्ह्यातील नामवंत ५० चित्रकारांचे चित्रशिल्प प्रदर्शन नाशिकच्या प्रसिद्ध एच सी जि मानवता कॅन्सर सेन्टर येथे भरले होते. या प्रदर्शनात १०० कलाकृती प्रदर्शित केल्या गेल्या. नाशिकमधील कलारसिकांनी या प्रदर्शनास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या प्रदर्शनाला नाशिक मधील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. यामध्ये प्रामुख्याने आमदार देवयानी फरांदे, नाशिक पोलीस आयुक्त रविंदर सिंगल, आंतराष्ट्रीय कॅलिग्राफी चित्रकार अच्युत पालव, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, विश्वास बँकेचे व्यवस्थापक विश्वास ठाकूर, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक रतन लथ, तसेच औद्योगिक , वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या प्रदर्शनास हजेरी लावली व या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

आपल्या कलाकृतीचा उपयोग गरजू रुग्णांच्या आर्थिक मदतीसाठी व्हावा व एक सामाजिक ऋण फेडण्याचे समाधान यातून मिळाले हीच भावना या प्रदर्शनातील सर्व सहभागी कलाकारांची होती.

एच सी जि मानवता कॅन्सर सेन्टर चे संचालक डॉ. राज नगरकर यांच्या संकल्पनेने या प्रदर्शनाची जबाबदारी चित्रकार अतुल भालेराव यांनी सांभाळली. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी चित्रकार, नासिक कलानिकेतन, नासिक मिसळ क्लब, एस.एम.आर.के चित्रकला महाविद्यालय, क. का. वाघ कला महाविद्यालय, ललित कला महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे व नाशिकमधील नामांकित चित्रकारांचे योगदान लाभले.

LEAVE A REPLY

*