Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या सेल्फी

झोमॅटो बॉयने अवघ्या पाच महिन्यात घेतली ‘स्पोर्ट बाईक’; झोमॅटोच्या संस्थापकांनी घेतली दखल

Share

नवी दिल्ली : प्रामाणिकपणे केलेले काम आणि जिद्दीने साकारलेली प्रगती हि माणसाला यशस्वी करत असते. म्हणजेच आपल्यातील प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम माणसाच्या आयुष्यात नवी चेतना निर्माण करतात. असेच एक उदाहरण म्हणजेच हरियाणातील झोमॅटो मध्ये काम करणारा सुरज.

हरियाणा राज्यातील करनाल या छोट्याशा खेड्यातील सुरज झोमॅटॊत काम करीत आहे. सुरजने सहा महिन्यापूर्वी झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलेव्हरी मध्ये काम करण्यास सुरवात केली. नोकरी रुजू होण्यापूर्वी त्याने ठरविले होते कि, पुढील पाच महिन्यात KTM RC 200 ही बाईक घेण्याचं स्वप्न उराशी बाळगले. आणि त्याने खरोखरच कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर पाच महिन्यात KTM RC 200 ही स्पोर्ट बाईक घेतली.


दरम्यान झोमॅटोचे संस्थापक दीपेंदर गोयल यांनी सुरजच्या या कामाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी एका ट्विटद्वारे सांगितले कि,आपण मनावर घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. यासाठी मेहनत, जिद्द असणे आवश्यक आहे. आणि सुरजाने या गोष्टी अतंतोतंत पाळल्या त्यामुळे आज त्याने पाच महिन्यात स्वप्न पूर्ण केले. अशाच प्रकारे बाईकच नव्हे तर आयुष्यातील कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर मेहनत आणि जिद्द असणे आवश्यक आहे.

याचसोबत अनेक लोकांनी ट्विटला रिप्लाय देत सुरजचे अभिनंदन केले आहे. सुरजने आपल्या कामाला देव मानून कठीण परीश्रमातून त्याचे स्वप्न साकार केले. त्याने स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करीत ध्येया पर्यत पोहचून आपल्या कष्टाचं चीज केलं.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!