Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश

‘जग्वार’ घेऊन दिली नाही म्हणून नदीत ढकलली ‘बीएमडब्ल्यू’

Share

हरियाणा | वृत्तसंस्था

हल्ली तरुणांन मध्ये महागड्या कारची खूपच क्रेझ पाहायला मिळते. बहुतांशी चित्रपटातील गाण्यांनमध्ये महागड्या कार सहज पाहायला मिळतात. मुख्यत पंजाब आणि हरियाना  राज्य मधील तरुणांन मध्ये हि क्रेझ जास्त प्रमाणात पाहायला मिळते. याच प्रलोभनांना बळी पडून महागड्या कारची हौस भागवली जाते.

हरियाणामधील यमुनानगरमध्ये विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. वडीलांनी जग्वार कार घेऊन द्यायला नकार दिला म्हणून स्वत:ची बीएमडब्ल्यू कार मुलाने नदीत ढकलून दिल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाण्यात ही कार दूरवर वाहत जाऊन एका बेटावर अडकली. त्या नंतर तिला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांन कडून तरुणाची चौकशी सुरु आहे.

बीएमडब्ल्यू आणि जग्वार या गाड्यांची किंमत ५० लाखांहून अधिक आहे. या कार विशेष श्रेणी मध्ये येतात म्हणूनच तरुणांन मध्ये या कारविषयी विशेष आकर्षण आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!