Type to search

धुक्यामुळे ५० वाहने एकमेकांना धडकली; ८ जणांचा मृत्यू

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

धुक्यामुळे ५० वाहने एकमेकांना धडकली; ८ जणांचा मृत्यू

Share

नवी दिल्ली : हरियाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे.

हा अपघात झज्जर बायपासजवळ सकाळी घडला आहे. धुक्यामुळे एकामागून एक अशी मोठ्या संख्येने वाहने एकमेकांना धडकली. जीप आणि ट्रक यांच्या झालेल्या अपघातात जीपमधील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकील २ लाख, गंभीर जखमींना १ लाख आणि किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये मदत हरियाणा सरकारने जाहीर केली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे. दिल्लीतील तापमानाचा पारा ४.६ अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!