तनुश्री दत्ताला हार्वर्ड्समधून आमंत्रण, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

0
तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात ती तिचा बॉलिवूड प्रवास, महिलांवर होणारे अत्याचार अशा विषयांवर चर्चा करणार आहे. तनुश्री दत्ताने 2018 मध्ये ज्येष्ठ नाना पाटेकर यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपाचं पुनर्रउच्चार करत मीटू चळवळीची सुरुवात केली होती. ‘हॉर्न ओके’ या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.

 

तनुश्राने सुरु केलेल्या चळवळीनंतर #मीटू अशी चळवळ सुरु झाली होती. अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाबद्दल जाहीररित्या सांगितलं होतं. यामध्ये बॉलिवूडसह अनेक दिग्गज मंडळीची नावं समोर आली होती. यात संस्कारी बाबूजी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता.

LEAVE A REPLY

*