Video : त्र्यंबकेश्वर तालुका कुपोषण मुक्त करणार : सोमेश्वरानंद

0
त्र्यंबकेश्वर | महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वर तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी हरसूल येथे उद्या (दि.२) आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मना सेवाभाव असावा जनहिताचा, प्रचार प्रसार करावा स्वछतेचा…’ असे म्हणत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोगराई कुपोषण मुक्तीचे सीमोल्लंघन त्यांनी विजयादशमीच्या दिवशी केले. त्यानंतर उद्या सोमवार (दि.२) गांधी जयंतीच्या दिवशी हरसूल येथे हिरे महाविद्यालयात भव्य आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी भागातील महिला, बालके यांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार केला जाईल. बालके हे देशाचे भविष्य असल्याने कुपोषणा पासून मुक्ती देण्याचे एतिहासासिक काम करणार असल्याची माहिती श्रीराम शक्तीपिठाचे संस्थापक श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज. श्रीनाथानंद सरस्वती महाराज, साधक रवी अग्रवाल सह आश्रमातील साधक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर तालुका कुपोषण मुक्त करण्यासाठी हरसूल परिसरातील गावामध्ये कुपोषित बालके यांचा सर्व्हे करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात आवश्यक जीवनसत्वे बालकांना तसेच गर्भवती माता भगिनींना मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण अधिक दिसून येते.

उद्या त्यांच्याकडून आदिवासी बहुल भागात भव्य आरोग्य शिबीर होत असून तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*