Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

हरसूल : घोटविहिरा गावाच्या डोंगराला व रस्त्याला तडे; ग्रामस्थांमध्ये भीती

Share

हरसूल | वार्ताहर 

पेठ तालुक्यातील घोटविहिरा या ग्रुप ग्रामपंचायतमधील उंबरमाळ या गावात लगतच रस्त्याला व डोंगराला मोठ्या प्रमाणात तडे आज सायंकाळी पडले. तडे पडण्यास सुरुवात झाल्याने घोटविहिरा व उंबरमाळ गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  .
दोन दिवसांपूर्वी जवळील असलेल्या पिपळवटी या गावाजवळ मोठ्याने आवाज ऐकला गेला असल्याने भूकंप सदृश्य परिस्थिती व  जमीन खचण्याचा प्रकार असल्याची चर्चा असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

दरम्यान, घोटविहिरा ग्रामपंचयात अंतर्गत उंबरमाळ या छोट्या वस्तीच्या ग्रामस्थानी व पोलीस पाटील यशवंत चौधरी यांनी पेठ तहसीलदार हरीश भामरे यांना संपर्क साधत वरील घटनेची माहिती दिली. त्यानंतर भामरे यांनी ग्रामस्थांना हलविण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आज सायंकाळी रस्त्याला पडलेले तडे न पुढे डोंगराला सुद्दा मोठ्या प्रमाणात पडले आहे .त्या वरील प्रकार जमीन खचण्याचा प्रकार आहे की भूकंप सारखे परिस्थिती आहे.

त्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या ग्रामस्थांनी तातडीने पोलिस पाटील सरपंच यांच्यासोबत तहसीलदार पेठ हरीश भामरे यांना वरील घटनेची माहिती दिली.

घोटविहिरा गावातील घटनेची माहिती मिळताच त्यांनी उंबरमाळ या छोट्याशा पाड्यावरील कुटुंब रात्री हलवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याला सायंकाळी पाच वाजता पडलेल्या भेगा ह्या अंधार पडतो डोंगरापर्यंत गेल्यावर त्या मोठ्या होत गेल्याने घोटवीरा पिंपळवटी उंबरमाळ या गावांमध्ये रात्री भीतीचे वातावरण पसरले आहे .

रात्री उशिरा पर्यंत पेठ तहसीलदार हरीश भामरे हरसूल पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी बढे यांनी घोटविहिरा कडे धाव घेऊन सरपंच अनुसया भांगरे सुभाष चौधरी, एकनाथ चौधरी, मनोहर चौधरी,  नंदराज चौधरी,  यशवंत चौधरी (पोलीस पाटिल) याच्या मदतीने उंबरपाडा ग्रामस्थांना घोटविहिरा गावामध्ये हलविण्यासाठी काम चालू केले आहे.

दोन दिवसापूर्वी डोंगराच्या बाजूला असलेल्या पिंपळवटी या गावात मोठा आवाज झाला व आज सायंकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास उंबरमाळ च्या वरती असलेल्या रस्त्यावर जाताना बघितले .सायंकाळच्या सुमारास तडे वाढत गेले . याबाबत तहसीलदार पेठ यांना कळवले आहे ही परिस्थिती जमीन खचण्याची आहे किंवा भूकंपाचे आहे त्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही परंतु भीती खूप वाटत आहे.

यशवंत चौधरी, पोलीस पाटील घोटविहिरा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!