Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

हर्षवर्धन करतोय युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट?

Share

मुंबई – ‘मोहोब्बते’ फेम अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंग काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नव्हे, तर हे दोघे विवाहदेखील करणार होते. मात्र, युवराजच्या आईचा या गोष्टीला नकार असल्याने हे लग्न होऊ शकले नाही. आता किम शर्मा ‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

‘सनम तेरी कसम’ हा २०१६ साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई करू शकला नाही. पण यात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता हर्षवर्धन राणे मात्र तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. आता हर्षवर्धन पुन्हा एकदा चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे त्याचा नुकताच व्हायरल झालेला फोटो. या फोटोमध्ये तो ‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्री किम शर्मासोबत हातात हात घालून फिरताना दिसत आहे. हर्षवर्धन आणि किम शर्मामध्ये नेमकं काय शिजतंय असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

युवराजसोबतच्या ब्रेकअपनंतर किमने अली पुंजानी नावाच्या एका व्यवसायिकासोबत विवाह केला. मात्र, हे नाते अधिक काळ टिकू शकले नाही. काही वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेत या नात्याला पूर्णविराम दिला. यानंतर आता किम हर्षवर्धनसोबत रिलेशनमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!