‘पोकेमॉन गो’ नंतर आता ‘हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट’ गेम; निअँटीक लॅबची घोषणा

0

निअँटीक लॅबने बनवलेल्या पोकेमॉन गो गेमला जगात अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. अर्थात पहिल्या काही महिन्यांमध्ये या गेमबाबत तयार झालेला हाईप बर्‍याच प्रमाणात कमी झाला असला तरी याची युजर्स संख्या सातत्याने वाढत आहे.

या पार्श्‍वभूमिवर, निअँटीक लॅबने हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेम या नावाने नवीन गेम सादर करण्याची घोषणा केली आहे. वॉर्नर ब्रदर्स इंटरअ‍ॅक्टीव्ह एंटरटेनमेंट आणि डब्ल्यूबी गेम्स यांच्या सहकार्याने हा नवीन गेम लाँच करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

निअँटीक लॅबने आपल्या या आगामी गेमबाबत फारशी माहिती वा टिझर प्रदर्शीत केलेला नाही. तथापि, एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याची प्राथमिक माहिती दिली आहे.

पोकेमॉन गो हा गेम ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) म्हणजेच विस्तारीत सत्यतेवर आधारित आहे. याचप्रमाणे हॅरी पॉटर : विझार्डस् युनाईट गेमही एआरवरच आधारित असेल.

 

LEAVE A REPLY

*