Video : त्र्यंबकेश्वरमधील हरिहर भेटीचा संपूर्ण सोहळा

0
ञ्यंबकेश्वर | (देवयानी ढोन्नर) | ञ्यंबकेश्वर मंदिरात मध्यरात्री 12 च्या सुमारास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात विशिष्ट सोहळा संपन्न झाला.

देवस्थान कोठीतून विष्णू आणि शंकराचे मुकुट पालखीद्वारे पूर्व दरवाज्यातून गाभाऱ्यात नेण्यात आले. त्यास हरीहर भेट असे म्हणतात.

याप्रसंगी गाभाऱ्यात शिवपिंडी समवेत वैकुंठ चतुर्दशी निमित्त महापूजा झाली. मात्र ही महापूजा संपन्न होत असतांना गाभाऱ्याचे मुख्य द्वार बंद करण्यात आले.

परंपरेप्रमाणे महापूजा संपन्न झाल्यावर शंकराचे आणि विष्णूचे मुकुट उपस्थित असलेल्या भाविकांना दर्शनासाठी किमान 10 ते 20 मी. गाभाऱ्यात होते.

त्यांनतर पुन्हा पूर्व दरवाज्यासमोर उभ्या असलेल्या पालखीत हे मुकुट ठेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून देवस्थान कोठीत स्थानापन्न करण्यात आले. अशाप्रकारे वैकुंठ चतुर्दशी आणि हरिहर भेट संपन्न झाली.

या संपूर्ण सोहळ्याचे व्हिडीओ बघण्यासाठी क्लिक करा.

Video : Deoyani Dhonner

 

त्र्यंबकेश्वराची देव दिवाळी- त्रिपुरारी पौणिमा

LEAVE A REPLY

*