Type to search

Featured सार्वमत

जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवल्यास महाराष्ट्रात काँग्रेसला सुगीचे दिवस येतील

Share

हार्दिक पटेल : विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करण्याचे आवाहन

शिर्डी (प्रतिनिधी) – काँग्रेसला जर महाराष्ट्र्रात सत्तेवर यायचे असेल तर सर्वसामान्य जनतेला भेडसावणार्‍या समस्यांवर आपल्याला आवाज उठवावा लागेल. आपण जर गावा-गावांत गेलो आणि लोकांच्या समस्या जाणून प्रचारावर भर दिला तर विजय मिळवणे अवघड नाही, असे प्रतिपादन गुजरातमधील पाटीदार सामाजाचे नेते, काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे येथे आयोजित केलेल्या रायस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर युवा मंथनमध्ये ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरु, गुजरात मधील काँग्रेचे युवानेते हार्दिक पटेल, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही., प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार शिवम शंकरसिंग, ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, नदीम जावेद, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते.

भाजपच्या नेत्यांनी कधीच आपल्या रक्ताचा एक थेंबही देशासाठी सांडलेला नाही. आणि हाच भाजप भारत माता की जयची घोषणा देऊन देशाला देशभक्ती शिकवत आहे, याला काय म्हणावे अशी घणाघाती टीका काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी, माजी खासदार राजीव सातव यांनी भाजपचे नाव घेऊन केली. राज्यातील शिवसेना-भाजप सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, गेली चार वर्षे दररोज एकमेकांशी भांडणार्‍या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी केवळ राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेऊन लोकसभेला युती केली. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला काँग्रेसची ताकद दाखवून द्यावी लागेल. आता लढायचे ते जिंकण्यासाठीच. नेता हा सत्यजीत तांबे यांच्यासारखा असला पाहिजे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

भाजपकडून लोकांत फूट पाडण्याचे उद्योग
समाजामध्ये अफवा पसरवून सामान्य लोकांमधे फूट पडायची, विविध धर्म आणि पंथांमध्ये फूट पाडून भांडणे लावण्याचे काम सत्ताधारी भाजप करत असल्याची टीका आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

तुमच्याकडे रंगा तर आमच्याकडे राहुल
अखिल भारतीय काँग्रेसचे सहसचिव कृष्णा अल्लावरू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक गावा-गावांत जाऊन भाजप आणि शिवसनेच्या विरोधात आपल्याला लढाई लढायची आहे. जो नेतृत्व करतो, तो बोलतो कमी आणि काम जास्त करतो. येत्या विधानसभा निवडणुकीची लढाई सोपी नाही पण अशक्यही नाही हे लक्ष्यात असू द्या. त्यांच्याकडे रंगा असेल तर आमच्याकडे राहुल आहेत.

फडणवीस सरकारविरुद्ध जनमत तयार करा
अ.भा. काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख नदीम जावेद आपल्या भाषणात म्हणाले, ज्याप्रमाणे हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध जनमत तयार केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही फडणवीस सरकारच्या विरोधात युवा नेत्यांनी आवाज उठवावा. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात लढ म्हणणारे अनेकजण आहेत. पण कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करणारे खूप कमी नेते असल्याची भावना मांडली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!