Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गारपीट, अवकाळीने 900 हेक्टचरे नूकसान; जिल्हा प्रशासन : कांद्याला सर्वाधिक फटका

Share

नाशिक । प्रतिनिधी

नांदगाव तालुक्याला गारपिट व अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून एकूण 900 हेक्टरवरील पिके आडवी झाली आहे. त्यात अवकाळीने 250 तर गारपिटीने 650 हेक्टर नुकसानीचा समावेश आहे. कांंदा, हरभरा,भुईमूग व फळबागांचा त्याच समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले असून हा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे.

ऐन उन्हाळ्यात राज्याला गारपिटीच्या संकटाला समोरे जावे लागत आहे. विदर्भ व मराठवाड्यात गत आठवड्यात जोरदार गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही गारांंचा पाऊस झाला. शनिवारी सायंकाळी नांदगाव तालुक्यात जोरदार गारपीट व अवकाळी पाऊस झाला. तालुक्यातील पोखरी, कासारी, बाबूळवाडी, डॉक्टरवाडी, जळगाव बुद्रुक येथे गारपिटीचा तडाखा बसला. त्यात मका, रांगडी कांदा, हरभरा, गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे.

मार्केटमध्ये नेण्यासाठी शेतात काढून ठेवलेला कांदा अचानक झालेल्या पावसाने भिजला. अवकाळीने 250 हेक्टरवरील गहू, कांंदा, हरभरा, मका, भुईमूग आडवे झाले. तर, गारपिटीने 650 हेक्टरवरील गहू, कांदा, हरभरा, मका या पिकांंसह द्राक्ष व मोसंबी बागा उध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेले नगदी पीक शेतकर्‍यांना गमवावे लागले. शासनाकडून या नूकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर पंंचनामे पूर्ण केले आहेत.

आस्मानी, सुलतानी संकट

बाजारपेठेत कांदा दर घसरल्याने शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. भाव मिळावा यासाठी तो रस्त्यावर उतरला आहे. तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेले कांदा पीक गारपिटीत आडवे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!