Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बागलाण : संततधार पावसाने अवघ्या १७ दिवसांत हरणबारी ‘ओव्हरफ्लो’

Share

सटाणा | ता. प्र.

बागलाण तालुक्यातील हरणबारी धरण आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास १०० टक्के भरले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार धरण ओव्हरफ्लो झाले असून ५६ क्युसेकच्या सरासरीने पाणी मोसम नदीतून प्रवाहित झाले आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून कोरड्याठाक असलेल्या मोसम नदीत पाणी आल्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गत सतरा दिवसांपूर्वी हरणबारी धरणामध्ये 0% पाणीसाठा होता. 30 जुलै रोजी हरणबारी धरणामध्ये 60 टक्के जलसाठा निर्माण झाला होता. पश्चिम पट्ट्यामध्ये गत आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असल्याने अखेर आज सकाळी साडेआठ वाजता हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने मौसम खोऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

गत पंधरा वीस दिवसांपूर्वी हरणबारी धरण कोरडेठाक होते. धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने संपूर्ण मोसम खोऱ्यात चिंतेचे वातावरण होते.

अवघ्या सतरा दिवसातच हरणबारी धरण संपूर्ण क्षमतेने भरल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून हरणबारी धरणामधून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांना दिलासा मिळाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!