Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

हॅपी बर्थडे शंकर महादेवन; आयटम सॉन्ग ते हटके इमोशनल गाण्यांचा बादशाह

Share

मुंबई | प्रतिनिधी

सुरेल स्वरांनी रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शंकर महादेवन यांचा आज 53 वा वाढदिवस. महादेवन यांच्या हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड रसिकांच्या मनाला अक्षरश: वेड लावले आहे.

‘ब्रिथलेस’ गाण्याने महादेवन यांना एक वेगळी ओळख खऱ्या अर्थाने दिली. हे गाणे जेव्हा त्यांनी गायले तेव्हा जवळपास  तीन मिनिटे त्यांनी श्वास रोखून धरला होता. जवळपास 6 मिनिटांच्या या गाण्यात त्यांनी 3 मिनिटं श्वास रोखून धरला होता. संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.

महादेवन यांना आतापर्यंत 4 वेळा उत्कृष्ट गायक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा सरस गाणी त्यांनी गायली आहेत.

महादेवन यांचे कुटुंबीय केरळमधील तमिळ अय्यर कुटुंब. त्यांचा जन्म ३ मार्च 1968 रोजी मुंबईत झाला. मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रच असल्याचे ते नेहमी सांगतात.

महादेवन यांनी ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. त्यांनी गायनासोबतच मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी घेतली.

त्यानंतर 6 वर्ष त्यांनी कंपनीत नोकरीही केली. त्यांनी बॉलिवूडमधील आयटम सॉन्गपासून ते तारे जमीन पर सारख्या चित्रपटातील हटके आणि इमोशन संगीतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!