Type to search

Happy Birthday : अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस

मुख्य बातम्या हिट-चाट

Happy Birthday : अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस

Share
मुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. लाखो-करोडो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हृतिकने आजतागायत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आज तो ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हृतिकचे सिनेमा करियर-

२००२ साली त्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडूपरहिट ठरला होता. त्यानंतर २००३ मध्ये त्याचा ‘कोई मिल गया’ या चित्रपटानेही प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ निर्माण केली. या चित्रपटानंतर ‘क्रिश’ आणि ‘क्रिश-३’ हे चित्रपटही तुफान गाजले. ‘अग्नीपथ’ चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत मुख्य भूमिका साकारली होती. जोधा-अकबर – या चित्रपटातून हृतिकने पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली होती.
काबिल या फिल्ममध्ये – हृतिकने यामी गौतमसोबत या चित्रपटात अंध व्यक्तिची भूमिका साकारली होती. आता त्याचा ‘सुपर-३०’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुझानकडून शुभेच्छा


हृतिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुझान खान हिने सोशल मीडियावर नुकतेच खास पोस्ट लिहिली असून त्यांच्या मैत्रीच्या नात्याला इथे अधोरेखित केलं आहे. Happiest happy birthday to my BFF…. असं लिहित तिने हृतिकसोबतचे आणि आपल्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर केले. अवघ्या काही तासांमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये बी- टाऊनच्या या ‘ग्रीक गॉड’ला म्हणजेच हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!