Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

हॅप्पे व उबर फॉर बिझनेस यांच्यात व्यावसायिक करार

Share
नाशिक | भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या फिंटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅप्पे आणि जागतिक पातळीवर आघाडीच्या उबर यांच्यामध्ये व्यावसायिक कराराची भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे व्यवसायासाठी प्रवास करणार्‍या प्रवाशांना त्यांच्या बिझनेस राईडसच्या खर्चाचा हिशेब ठेवण्यात मदत होणार आहे.
या नवीन भागीदारीसह हॅप्पेच्या कॉर्पोरेट ग्राहकांना प्रवासावर किती खर्च होत आहे, याची स्पष्टता मिळेल. तसेच खर्चातही बचत होईल आणि कर्मचार्‍यांची उत्पादकता वाढण्यात मदत होईल असा दावा केला जात आहे. कॉर्पोरेट फायनान्स विभागाला अधिक नियंत्रण मिळेल आणि प्रत्यक्षात होणारा खर्च याबाबत त्या त्या वेळी माहिती मिळेल आणि त्याची परतफेड करण्यामध्ये सुलभता प्राप्त होईल असेही सांगण्यात येत आहे.
याबाबत बोलताना हॅप्पेचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल राय म्हणाले की, हॅप्पेमध्ये प्रत्येक गोेेष्ट आम्ही जे करतो त्याने वापरकर्त्यांच्या जीवनात अधिक सुलभता यावी यावर लक्ष्य केंद्रित करते. उबरबरोबर आमची भागीदारी याच तत्त्वज्ञानाचा एक भाग आहे. व्यवसायासाठी प्रवास करणार्‍या कर्मचार्‍यांना आता स्वत: म्हणजे मॅन्युअली प्रवासाची माहिती देण्याची गरज नाही.
उबर फॉर बिझनेसचे एपीएसी क्षेत्राचे प्रमुख अर्जुन नोव्हार म्हणाले की, उबर फॉर बिझनेसला भारतामधून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आमच्या प्रवाशांना त्यांच्या रिसिट स्वयंचलितपणे परतफेडीकरिता सादर करण्यासाठी सक्षम करणे हे व्यवसायानिमित्त प्रवास अधिक सोपा व तणावमुक्त करण्यासाठी एक तार्किक पाऊल आहे. हॅप्पेच्या भागीदारीमुळे कॉर्पोरेटसना आता प्रवासाच्या पावत्यांसाठी चिंता करण्याची गरज नाही.
उबर फॉर बिझनेसबरोबर भागीदारी म्हणजे हॅप्पेने ट्रॅव्हल अ‍ॅन्ड एंटरटेन्मेंट (टीअ‍ॅन्डएस) खर्चाच्या व्यवस्थापनासाठी घेतलेल्या अनेक पुढाकारांपैकी एक आहे. हॅप्पेने नुकतेच स्टेट ऑफ इंडियन एंटरप्राईज ट्रॅव्हल अ‍ॅन्ड एक्सपेंस मॅनेजमेंट 2018 या नावाने सीएफओ बेंजमार्क रिपोर्टचे अनावरण केले होते. हा अभ्यास हॅप्पेसाठी सीएफओ इंडिया मॅग्झिनने हाती घेतला होता.
ज्यामुळे भारतातील कंपन्यांमध्ये ऑटोमेशनचे प्रमाण आणि ट्रॅव्हल अ‍ॅन्ड एंटरटेन्मेंट (टीअ‍ॅन्डई) खर्चाचे व्यवस्थापन याबाबत माहिती मिळाली. हॅप्पेने आपल्या एक्सपेन्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मच्या एंटरप्राईज व्हर्जनचे देखील अनावरण केले.
यामध्ये एआययुक्त क्षमता असून जीमेल इनवॉईसेस, एमएमएस, ट्रॅव्हल बुकींग सॉफ्टवेअर्स, क्रेडीट कार्ड स्टेटमेंटस, पावत्यांचे ऑटो स्कॅन इत्यादी वरून माहितीसाठा स्वयंचलितपणे मिळविण्यास कर्मचार्‍यांना मदत होते. एंटरप्राइज व्हर्जनमध्ये अकाऊंटींग ईआरपी, एचआरएमएस सोल्युशन, ट्रॅव्हल मॅनेजमेंट सोल्युशन, इन हाऊस सोल्युशन, सीआरएम यांसारखी एंटरप्राईज सॉफ्टवेअरची अखंड श्रेणी एकीकृत करते.
हॅप्पे उबर इंटीग्रेशन कसे काम करते
हॅप्पेचे कॉर्पोरेट ग्राहक आपल्या कंपनीसाठी उबर फॉर बिझनेस अकाऊंट ओपन करून ऑटो एक्सपेन्स फीचरचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीच्या उबर फॉर बिझनेस प्रोफाईलचा उपयोग करण्यासाठी आमंत्रित करू शकतात.
प्रोफाईल एकदा सुरू झाल्यावर कर्मचार्‍यांनी पेमेंट सेटींगमध्ये एक्सपेन्स मॅनेजमेंट प्रोव्हाईडर म्हणून हॅप्पे निवडायचे आहेे. प्रत्येक वेळी जेव्हा कर्मचारी बिझनेस प्रोफाईलचा वापर करून प्रवास करतील तेव्हा उबरद्वारे कर्मचार्‍यांच्या बिझनेस प्रोफाईल अकाऊंटवरून हॅप्पे अकाऊंटला प्रवासाची माहिती पाठविली जाईल. यासाठी कुठल्याही अतिरिक्त माहितीची गरज नाही. यानंतर हॅप्पेद्वारे या माहितीसाठ्याचे रूपांतर खर्चाची यादी म्हणून करून सादर करण्यासाठी तयार होईल.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!