Type to search

maharashtra मुख्य बातम्या

मुंबईतील दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या हानिफ सईदचा मृत्यू

Share
नागपूर : २००३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असणाऱ्या मोहम्मद हनिफ सय्यद याचा मृत्यू  झाला आहे. मृत्यूदंड, आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेला हनिफ हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तिथेच प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शनिवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते जेथे त्याचा मृत्यू झाला आहे.
सईदच्या मृत्यूबाबत माहिती देताना कारागृहाचे अधीक्षक राणी भोसले यांनी सांगितले की, शनिवारी अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अड हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात तातडीने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले मात्र, दीड तासांच्या अवधीतच त्याचा मृत्यू झाला.
या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच ते समोर येईल. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधीक्षक भोसले यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी सईदच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान, ऑटोस्पाय झाल्यानंतर हानिफचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!