क्रिकेटप्रेमीने मैदानात जाऊन घेतली विराटची गळाभेट

0

हैदराबाद : भारतात क्रिकेट फॅनची संख्या कमी नाही. क्रिकेट रसिक आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी काही करण्याची तयारी दर्शवतो. नुकताच विराटच्या एका चाहत्याने आपले विराटबद्दल असलेले प्रेम चक्क मैदानावर सेल्फी काढून दाखवले. हैदराबाद कसोटीत याची प्रचिती आली.

हैदराबाद येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराटचा एक चाहता सुरक्षा रक्षकाला चकवा देत मैदानात आला. विराटची गळाभेट घेऊन त्याच्या सोबत सेल्फी देखील घेतली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानाबाहेर काढले.

यापूर्वी देखील विराटसोबत राजकोट कसोटीत असा प्रसंग घडला होता. विराटने शतक पूर्ण केल्यावर एक चाहता मैदानात येऊन त्याच्या सोबत फोटो काढण्यासाठी आला. त्यानंतर सुरक्षारक्षकांने त्याला बाहेर काढले. या युवकांमुळे काही वेळ सामन्यात व्यत्यय आला होता.

LEAVE A REPLY

*