हतगड किल्ल्याची दुरवस्था; रस्त्यावर दगड गोटांचे साम्राज्य

0
हतगड | सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्यावरती जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या व संरक्षण कठडे गेल्या वर्षीच दुरुस्त करण्यात आले होते. मात्र पावसाळा सुरु होताच येथील पायऱ्या तसेच रस्ता उखडला असून रस्त्यावर दगड दिसून येत आहेत.

येथील सर्वच कामे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. पावसाळ्यात अनेक पर्यटक याठिकाणी भेट देतात. मात्र संरक्षण कठडे, पायऱ्या उखडल्याने धोका निर्माण झाला आहे.

किल्ल्यासाठी करण्यात आलेले प्रत्येक काम हा निकृष्ट असून शासनाचा निधी विनाकरण वाया घातला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

येथे रस्त्यावर दगड गोटे पडले आहेत. त्यामुळे पर्यटकांना गाडी नेणे अवघड होत असून अपघात होण्याची शक्यता आहे. येथे येणाऱ्या अनेक पर्यटकांनी येथील असुविधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 

एकीकडे असुविधा आणि येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांकडून वनविभाग मात्र पावतीद्वारे कर वसूल करत आहे. त्यामुळे अनेकजन नाराजी व्यक्त करतांना सांगतात जर कर वसूल केला जातोय तर मग सुविधा का मिळत नाहीत.

निदान नाही काही तर वनविभागाने रस्त्यावर पडलेले दगड गोटे उचलून तर रस्ता प्रवासासाठी मोकळा करावा अशी मागणी केली जाते आहे.

LEAVE A REPLY

*