‘हासिल’ मालिकेचे होणार संपूर्ण आऊटडोर शुटींग; भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली मालिका!

0

लवकरच हासिल या हिंदी मालिकेत रसिकांना परदेशी लोकेशन्सचे दर्शन होणार आहे. तेही एका ठराविक भागासाठी नाहीतर या मालिकेच्या सगळ्या भागात आकर्षक लोकेशन्स पाहायला मिळतील. अशा प्रकारे संपूर्णपणे आऊटडोअर शूट होणारी ही पहिलीच मालिका असल्याचे बोलले जात आहे.

‘हासिल’ मालिकेत झायद खान, निकिता दत्ता आणि वत्सल शेठ असे फेमस कलाकार आहेत. शिवाय, ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली मालिका आहे ज्यात कोणताही ठराविक सेट नाही. क्रिएटिव्ह टीमने खूप रिसर्च करून भारतात आणि विदेशात विविध लोकेशन्स निवडत मालिकेचे शूट केले आहे. अलीकडे या टीमने मॉरिशस येथे दोन आठवडे चित्रीकरण केले.

हासिलच्या प्रोमोच्या चित्रीकरणासाठी क्रिएटिव्हटीमने दोन हेलिकॉप्टर्स व या भव्य मालिकेस साजेशा 4-5 स्पोर्ट्स कार्स ठेवल्या होत्या.

‘हासिल’ हि मालिका एक रोमॅंटिक थ्रिलर आहे.

LEAVE A REPLY

*