Type to search

धुळे फिचर्स

धुळ्यात आयशरसह 30 लाखांचा गुटखा जप्त

Share

धुळे – 

शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीवर पोलिसांनी सापळा रचून आयशर वाहनासह 30 लाखांचा गुटखा जप्त केला. तसेच चालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.
मुंबई-आग्रा महामार्गाने एक लाल रंगाची आयशर (क्र. एम.पी. 09 जी.ई 1294) आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास चाळीसगाव चौफुलीवरून इंदुरकडून मालेगावकडे जात असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश मुंढे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोकाँ प्रेमराज पाटील, सुशिल शेंडे, मुख्तार शहा, नरेंद्र माळी असे पथक तयार चाळीसगाव चौफुलीवर सापळा रचला. त्यादरम्यान संशयीत आयसर गाडीला थांबविले. तपासणी केली असता त्यात 19 लाख 80 हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला भरलेल्या 50 गोण्या, 2 लाख 20 हजार रूपये किंमतीचा वी -1 तंबाखु भरलेल्या 50 गोण्या व 8ा लाखांचे आयशर वाहन असा एकुण 30 लाख रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

तसेच चालक रवि परबत खरते (वय 25 रा. रानगाव डेप ता. टिकरी जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व क्लिनर परबद नथ्थु वास्कले (वय 45 रा. कोईडी. ता ठिकरी जि. बडवाणी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मुद्येमाल पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक राजु भुजबळ व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!