संस्कारक्षम युवक घडले तरच देश महासत्ता : मोरे

0
अकोले (प्रतिनिधी) – संस्कारक्षम युवक घडले तरच देश महासत्ता होणार आहे. यासाठी गाव तेथे श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्र व घर तेथे सेवेकरी तयार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र त्र्यंबकेश्‍वरचे मार्गदर्शक, गुरुपुत्र चंद्रकांत मोरे यांनी केले.
अकोले येथील आयटीआय मैदानावर अकोले तालुका श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राच्यावतीने नवचैतन्य अभियान व रामेश्‍वरम येथील राष्ट्रीय मेळावा अंतर्गत आयोजित सत्संग मेळाव्यात ते बोलत होते.
मोरे म्हणाले की, स्वामी सेवा केंद्रामार्फत 16 विभागांत काम चालू असून प्रश्‍न उत्तरे, बालसंस्कार, आरोग्य, कृषी, विवाह संस्कार, व्रतवैकल्प अशा विविध मार्गातून दुःखीतांचे व आरोग्याचे प्रश्‍न मोफत सोडविले जातात.
कॅन्सर, व्यसनमुक्ती, डायबिटीस, ब्लडपे्रशर, मानसिक रुग्ण, चिंताग्रस्त परिस्थिती अशा विविध आजांरावर वनऔषधी वापराबाबत त्यांनी माहिती दिली. तर बालसंस्कार विभागातून सुसंस्कारीत पिढी तयार करण्याचे काम चालू असून मुलांनी आई-वडील, गुरू, थोरामोठ्यांचा सन्मान व आदर करावा असा सल्ला दिला. महिलांना समाजामध्ये 50 टक्के आरक्षण असले तरी या सेवामार्गात 100 टक्के आरक्षण दिलेले आहे.
यावेळी आदर्श सरपंच हेमलताताई पिचड यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक पुष्पा जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जयराम शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश मादास, शरद नवले, प्रमोद वाकचौरे, अशोक देशमुख, जयराम शिंदे, कुंडलिक लोखंडे, मनोहर नवले, प्रभाकर जाधव, डॉ. मच्छिंद्रनाथ लांडगे, यमुना मादास, लहानाबाई नवले, श्रीमती गावडे, वैजयंती छल्लारे, भाऊसाहेब घुले, राजू काळे, भाऊसाहेब वाकचौरे, शरद आरोटे आदींंसह तालुक्यातील सर्व सेवेकर्‍यांनी परिश्रम घेतले.

यावेळी तालुक्यातील कोतूळ, राजूर, चितळवेढे, निंब्रळ, वाशेरे, लिंगदेव, शेरणखेल, मेहेंदुरी, रुंभोडी, राजूर, कळस, कुंभेफळ, सुगाव, देवठाण, केळी – रुम्हणवाडी यासह तालुक्यातील सर्व केंद्रातील सेवेकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे गुलाबी थंडीत या मेळाव्यास ग्रामीण भागातील नव्हे तर नगर, नाशिक, ठाणे, पुणे जिल्ह्यातील सेवेकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोणताही गोंधळ न करता सेवेकर्‍यांनी चंद्रकांत दादा मोरे यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला. यासाठी कार्यकर्त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. विशेषतः महिला सेवेकर्‍यांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या सत्संग मेळाव्यातून शिस्त पहावयास मिळाली.

महिला व पुरुष असा भेदभाव नाही, महिलांचा समाजामध्ये मोठा आदर व सन्मान होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. महिलांवर अत्याचार करणार्‍या नराधमाचे दोष सिध्द झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नराधमांना देत असलेल्या शिक्षेप्रमाणे हात पाय तोडून मंदिरापुढे भिक मागण्यास बसविले तरच त्या शिक्षेची जरब समाजामध्ये राहील. फाशीची शिक्षा ही भरचौकात देणे गरजेचे आहे. त्यासाठी कायदयात बदल व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत सौदिअरेबियातील गुन्ह्याबदलची शिक्षा आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*