Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

गुरुनानक देवजी जयंती श्रीरामपूरमध्ये उत्साहात

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शीख धर्माचे आद्यगुरू गुरुनानक देवजी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत राजकीय व सामाजीक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठिकठिकाणी याफेरीचे स्वागत करण्यात आले. शीख धर्माचे आद्य गुरू गुरुनानदेवजी यांची जयंती विश्वामध्ये साजरी होत आहे. त्यानिमित्ताने शीख, पंजाबी, सिंधी समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मुख्यगुरुद्वारा येथे गेल्या तीन दिवसांपासून श्रीगुरु ग्रंथसाहेबचे अंखड पाठ सुरु होते. गुरुनानक जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची सजवलेल्या वाहनावरुन प्रभातफेरी काढण्यात आली.

या प्रभातफेरीचे खासदार सदाशिव लोंखडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, योगा गु्रपच्या वतीने अनिल कुलकर्णी, अशोक थोरे, मनसुख चोरडिया, श्रीराममंदिर चौकात अशोक उपाध्ये तसेच राष्ट्रीय सेवक संघाच्यावतीने देविदास चव्हाण, विजय ढोले, गणेश नवले, लव शिंदे, गणेश राठी, ज्ञानेश्वर अक्साळ, अशोक कानडे, डॉ.दिलीप शिरसाठ, सिध्दार्थ मुरकुटे, नगरसेवक मुक्तार शहा, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, डॉ. रवींद्र जगधने, अल्तमश पटेल, सकल जैन समाजाच्या वतीने अनिल पांडे, दीपक कदम, ज्ञानेश्वर मुरकुटे, विजय खाजेकर, शेळके, राजेंद्र देवकर, सुधीर वायखिंडे, ब्राम्हण संघटनेचे डॉ. नवनीत जोशी, विजय शेलार आदींनी प्रभात फेरीचे स्वागत केले.

गुरुव्दारा येथे पहाटे सुखमनीसाहेबचे पठण झाले. नंतर श्रीगुरुग्रंथसाहेब अंखड पाठची समाप्ती, प्रभात फेरी, गुरुद्वारामध्ये सांगता यानिमित्त सिंधी गुरुद्वारायेथे भंडाराचे अयोजन करण्यात आले होते. कार्तिकी त्रीपुरा पौर्णिमानिमित्त कमालपूर (डोमेगाव) येथे कीर्तन व भंडार्‍याचे अयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी सिंधी गुरुद्वारा व मुख्य गुरुद्वारा येथे 550 दिव्यांची माला करण्यात आली. तसेच रात्री कीर्तन ग्यानी अनोखसिंग मस्सकीन, भाईजीवनसिंग यांनी केले. मध्यरात्री जन्मोत्सव व आतषबाजी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगजितसिंग चुग, गुरुबच्चनसिंग चुग, लकी सेठी, राजन चुग, सॉन्टीसेठी, अमरीकसिंग चुग, मनजीतसिंग चुग, राजु बत्ररा, प्रितीपालसिंग बत्ररा, रजिंद्रसिंग सेठी, प्रितम नागपाल, ओम नारंग, बंटी गुरवाडा, अप्पु बत्ररा, गुलशन कत्रोडे, अमरमित चुग, टिंकु चुग, थानेदारसिंग कथुरीया, कमलजीत चुग, सुखमित बत्ररा, मनजीतसिंग बत्ररा आदी उपस्थित होते.

 

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!