Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

विकास मंडळात नेमके चालले काय ?

Share

गुरुकुलाचा प्रश्न : सभासद अंधारात

अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुमाऊली मंडळ सत्तेत आल्यापासून विकास मंडळात नेमके काय चालले आहे, हे सभासदांना समजायला मार्ग नाही. कारभार पारदर्शक असेल तर तो शिक्षक सभासदांपासून का लपवला जात आहे?, असा सवाल गुरुकुल मंडळाने केला आहे.
नेत्यांच्या हव्यासापायी गुरुमाऊली मंडळाचे दोन गट पडले. त्याचे आम्हाला काही घेणे देणे नाही. या दोन गटांत दाखवण्यापुरता वाद आहे.

बँकेच्या वार्षिक सभेला सभासदांच्या ठेवीतून दहा हजार रुपये विकास मंडळाच्या बांधकामासाठी देण्याचा प्रयत्न गुरुकुलने हाणून पाडला. बँकेचे अध्यक्ष विकास मंडळाचे जबाबदार पदाधिकारी असतात. त्यांचीही विकास मंडळात चाललेल्या गैरकारभाराला मूक संमती असल्याचे दिसते. नवीन इमारत नेमकी किती किमतीची आहे, त्याची निविदा कितीला दिली, याचा ताळमेळ नाही. उलट तेथे गाळे देण्याचे प्रलोभन दाखवून गुरुमाऊलीचा एक गट सभासदांची भरती करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून विकास मंडळाचे अध्यक्ष बदललेले नाहीत. इमारत बांधकामामुळे होणार्‍या आर्थिक लाभाच्या आमिषाने इतर संचालक गप्प आहेत.

वर्ष संपून गेले तरी विकास मंडळाची वार्षिक सभा नाही. आचारसंहितेचे कारण सांगून गैरकारभार उघडा होईल, या भीतीने सभा घेण्याचे टाळले जाते. गुरुकुलने सभासदांच्या ठेवीतून पैसे घेण्याचा डाव हाणून पाडल्याने संचालक इतर बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जुन्याजाणत्या शिक्षकांनी घेतलेली जागा तारण ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या बांधकामात शिक्षक नसलेल्या काही बड्या धेंडांनी गुंतवणूक केली आहे. भविष्यात ही जागा व इमारत शिक्षकांच्या मालकीची राहणार नाही.

याबाबत विकास मंडळाने श्वेतपत्रिका काढावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा ईशारा गुरुकुलाचे नेते रा.या.औटी,संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, बापूसाहेब लहामटे, लक्ष्मण टीमकारे, गजानन जाधव,इमाम सय्यद, विजय काकडे, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर यांनी दिला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!