Friday, May 3, 2024
Homeधुळेविद्यार्थ्यांसाठी गुरूजींच बनले ‘आधार’

विद्यार्थ्यांसाठी गुरूजींच बनले ‘आधार’

वाघाडी Waghadi। वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील बोरमपाडा (Borampada) येथील विद्यार्थ्यांनासाठी शाळेचे मुख्याध्यापकच (Headmaster) आधार बनले आहेत. विद्यार्थ्यांंना (students) शिक्षण देण्यासह त्यांचे आधार कार्ड (Aadhaar card) तयार करण्यासाठी पाडा, वस्ती, गाव फिरून पालकांचा शोध घेत कागदपत्रांचीही पुर्तता करत आधार कार्ड तयार करून आणले. त्यांच्या या धडपडीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

- Advertisement -

भोईटी (ता. धुळे) गावाजवळ बोरमळीपाडा म्हणून अतिदुर्गम लहानशा पावरा जमातींची वस्ती आहे. किमान 30 -35 एवढयाच झोपडया असून 2001 या वर्षी वस्तीशाळा म्हणून या शाळेला मान्यता मिळाली. त्यानंतर 2009 मध्ये वस्ती शाळेचे रुपांतर शासनाने जिल्हा परिषद शाळेमध्ये केले. अठरा विश्व दारिद्य असलेला येथील येथील पावरा जमातीला आपल्या उदरनिर्वाहासाठी तारेवरच्या कसरती करावी लागते. म्हणून शिक्षणाला येथील लोक दुय्यम मानत असतात.

बोरमळीपाडा या जि.प. शाळेवर गेल्या 2010 सालापासून मुख्याध्यापक म्हणून नारायण भगवान तायडे हे कार्यरत आहेत. त्यांनी येथील समस्यांचा अभ्यास करून येथील लोकांची बोली भाषा शिकली. त्यांच्याशी समरस होऊन ते संवाद साधत अध्यापनाचे धडे शिकवतात. तायडे हे उत्कृष्ट योग शिक्षक देखील आहेत. आपले शाळेतील कामकाज पूर्ण करून फावल्या वेळात योग विद्याधाम या संस्थेत देखील योग शिक्षक म्हणून निस्वार्थपणे सेवा देतात. जेव्हा ते या शाळेत रुजू झाले होते त्यावेळेसची व आताच्या परिस्थितीत मोठा बदल करण्यात त्यांना यश आले आहे. बोरमळीपाडा शाळेतील त्यावेळी विद्यार्थी पटसंख्या कमी होती. जे विद्यार्थी हजर असायचे त्यातही बरेचसे कामानिमित्त अधूनमधून येत असत.

अशा परिस्थितीत त्यांना येथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न व मेहनत करावी लागली. शिरपूर शहरापासून 32 कि.मी.अंतरावर ही वस्ती असल्याने जवळ म्हणून फक्त रोहीणी, भोईटी हेच गावं त्या लोकांना सोईस्कर आहे. या लोकांचा बाहेरील संबंध कमी असतो. या सर्व बाबी गुरुजींनी अगोदर समजून घेतल्या आणि मग त्यांनी नियोजन केले.

आजची परिस्थिती पाहता बोरमळीपाडा जि.प.शाळेची पटसंख्या 27 एवढी असून यापूढे देखील चांगले वातावरण राहील असे येथील गुरुजी सांगतात. शासनाने 2020-2021 या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता ही सरल पोर्टलला अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांनुसारच होणार आहे. म्हणून आधार असणे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे होऊन गेले आहे. आजतागायत बोरमळीपाडा शाळेतील एकूण पटसंखया 27 असून यापैकी 15 विद्यार्थ्यांचे आधार कार्डचे काम बाकी होते. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे नवीन तर काहींचे दुरुस्तीचे काम बाकी होते. काहींचे रेशन नाही तर बाकींचे फोटो नाहीत तर काही प्राथमिक पुरावे नसल्याने कामासाठी बाहेरगावी निघून गेले आहेत. इकडे आड तिकडे विहीरअशीच अवस्था येथील गुरुजींची होऊन गेली आहे.

गरीब पालकांना आधार काढण्यासाठी या लोकांना आपले काम सोडून शिरपूर शहराच्या चकरा माराव्या लागत आहेत. म्हणून याकामी मुख्याध्यापक तायडे यांनी स्वतः विद्यार्थी आधार शोध मोहीमेतंर्गत नवीन आधार काढण्याची सुरूवात केली. पाडा, वस्ती, गाव फिरून मुलांच्या व त्यांच्या पालकांचा शोध घेऊन विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचीही पुर्तता केली. इतर विद्यार्थ्यांना चोपडा तालुक्यातील लासूर येथे स्वतः नेवून कागदपत्रे मिळवित आधार केंद्रावर जावून स्वःखर्चाने आधार काढण्यात आले. त्यांच्या या कामाचे कौतूक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या