Type to search

Breaking : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Breaking : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी

Share
हरयाणा : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणी बाबा राम रहीम दोषी ठरला आहे. बाबा राम रहीसबोत चौघांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहीमला दोषी ठरवलं. 17 जानेवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे.

पत्रकार रामचंद्र छत्रपती हा डेऱ्यात होणाऱ्या अवैध घटनांशी संबंधित वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करत होता. २००२ मध्ये त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी रामचंद्रच्या कुटुंबीयांनी तक्रार केली होती. तसंच न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

२००७मध्ये सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. हत्येचा कट रचल्याचा आरोप राम रहीमवर ठेवण्यात आला होता. या हत्येच्या खटल्याची सुनावणी आज झाली. या सुनावणीसाठी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात कैद असलेल्या राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयानं राम रहीमसह कृष्ण लाल, कुलदीप आणि निर्मल सिंग यांना दोषी ठरवलं. १७ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!