Type to search

Breaking News जळगाव राजकीय

गुलाबरावांची बोलू देण्याची मागणी आणि भाजपची दाणादाण

Share

जळगाव /प्रतिनिधी

नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी गुलाबराव पाटील यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीतच त्यांची भेट गिरीश महाजन यांचेशी झाली. व्यासपीठावर लावलेल्या फलकावर उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याचे पाहून पाटील संतापले संतापातच त्यांनी गिरीश महाजन यांनी ही कोणती युती आहे.

आमच्या नेत्यांचा फोटो नाही, बंडखोर उमेदवार जगजाहीर भाजपचे बंडखोर म्हणून प्रचार करीत फिरत आहेत कोणी काही बोलायला तय्यार नाही. मला स्टेज वर बोलू द्या मी मोदींना विचारतो ही कोणती युती आहे. असे म्हणतात महाजन यांनी बोलू देण्यास नकार दिला.

त्यामुळे गुलाबराव आणखीनच संतापले त्यांनी थेट नाराजी व्यक्त करीत हे काय चाललंय म्हणत मी सभेतून जातो सांगताच मग खळबळ माजली. पाटील जात आहेत म्हटल्यानंतर त्यांना मनविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले श्रीराम खटोड सातत्याने गिरीश महाजन आणि वरीष्ट नेत्यांशी त्यांचे बोलणे करून देत होते. एकाने पाटील यांना गळ्यात फटका टाकायला विनंती केली ती ही पाटील यांनी फेटाळून लावली.

सरते शेवट नाराजीत च ते व्यसपीठावर गेले मात्र संपूर्ण सभा स्थळी मोदींचे भाषण संपल्यानंतर देखील गुलाबरावांचीच चर्चा लोकांमध्ये होती. दरम्यान भेदरलेल्या भाजप ने देखील चिमणराव पाटील यांना भाषणाची संधी दिली मात्र गुलाबराव यांना भाषण करूच दिले नाही. मात्र पाटील यांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेल्यामुळे फडणवीस यांनी मात्र भाषणात बँडखोरांकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!