Type to search

Video : सुरत : कोचिंग सेंटरला आग; १५ जणांचा मृत्यू

लोकांनी चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

Video : सुरत : कोचिंग सेंटरला आग; १५ जणांचा मृत्यू

Share

मुंबई : गुजरातमधील सुरतमध्ये तक्षशिला इमारतीला आग लागून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीला लागली आहे. या इमारतीला अत्यंत भीषण आगलागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. काहीजण या इमारतीत अडकलेही आहेत.

या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या आहेत.

दरम्यान या ठिकाणी आग लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी येथून उद्या मारत स्वतःचे प्राण वाचविले. परंतु यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. कदाचित मृतांचा आकडा वाढला असण्याचीही शक्यता आहे.

ही आग का लागली ते अद्याप समजू शकलेले नाही. या इमारतीत शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते. सध्या आग नियंत्रणात आणण्याचे काम आणि मदत व बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!