Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

उपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’

Share

अहमदाबाद : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या बेमुदत उपोषणाच्या नवव्या दिवशी आपले मृत्यूपत्र तयार केले आहे. यात त्यांनी त्यांची संपत्ती त्यांचे आई-वडील आणि एका गोशाळेत विभागली आहे. पाटीदार समाजाला आरक्षण, शेतकरी कर्जमाफा आणि आपला सहकारी अल्पेश कठीरिया यांच्या सुटकेच्या मागणीसाठी हार्दिक उपोषणाला बसले आहेत.

नेत्रदान करण्याची इच्छा

हार्दिकने आपल्या मृत्युपत्रात, “या निर्दयी भाजप सरकारच्या विरोधात २५ ऑगस्‍टपासून उपोषण करत आहे. माझे शरीर कमजोर पडत आहे. तसेच मी वेदना, अनारोग्य आणि संक्रमणाचा शिकार होत आहे. सातत्याने खालावत असलेल्या प्रकृतीमुळे या शरीरावर कोणताही भरवसा नाही. त्यामुळे मी अंतिम इच्छा जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे हार्दिकने लिहले आहे.” तसेच त्याने मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे.

पाटीदार समाजाचे एक अन्य नेता मनोज पनारा यांनी हार्दिकच्या मृत्यूपत्राची घोषणा केली. जर हार्दिक यांनी काही झालं तर त्यांच्या बँक खात्यातल्या ५० हजार रुपयांपैकी त्यांच्या आई-वडीलांना २० हजार रुपये आणि अहमदाबादच्या विरामगाम तालुक्यातील हार्दिक यांच्या चंदननगर या गावाजवळील गोशाळेला ३० हजार रुपये देण्यात यावेत, अशी हार्दिक यांची इच्छा आहे. हार्दिक यांचे पुस्तक ‘हु टूक माय जॉब’ ची ३० टक्के रॉयल्टी त्यांचे आई-वडील, बहीण यांच्यात वाटली जावी तर ७० टक्के भाग पाटीदार आरक्षण आंदोलनात मारल्या गेलेल्या १४ युवकांच्या नातेवाईकांना दिला जावा, अशीही त्यांची अखेरची इच्छा आहे. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही.

खासदार राजू शेट्टी यांचा उपोषणास पाठिंबा

स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनीही हार्दिक पटेलच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी हार्दिक पटेल आंदोलन करत असल्याने आपण पाठिंबा देत असल्याचे पत्र राजू शेट्टी यांनी दिले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!