गुजरात विधासभा निवडणुक : 137 उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद

0

असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स व गुजरात इलेक्शन वॉच या संस्थांनी केलेल्या विश्लेषणानुसार गुजरात विधासभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 977 उमेदवार रिंगणात आहेत.

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील 923 उमेदवारांचे विश्लेषण केले असता, 137 उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे.

त्यात खून, अपहरण, अत्याचार यांचे आरोप असल्याचे दोन स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या विश्लेषणात उघड झाले आहे. जवळपास 15 टक्के उमेदवार असे आहेत.

भाजपच्या 89 पैकी 10 उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. तर काँग्रेसचे असे 20 उमेदवार आहेत. 54 उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अपुरे असल्याने त्याचे विश्लेषण करता आले नाही असे गुजरात इलेक्शन वॉचचे पंकज जोग यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*