गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या यादीत 70 उमेदवारांची नावे जाहीरकेली आहेत.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. यादीमध्ये पहिलेच नाव मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे आहे. रुपानी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवणार आहेत.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा येथून निवडणूक लढवणार आहेत.

गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 9 आणि 14 डिसेंबरला गुजरातमध्ये मतदान होणार असून 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

 

LEAVE A REPLY

*