टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम; काचेपासून सर्जनशील वस्तूंचे उत्पादन

0

नवी दिल्ली : दैनंदिन खाण्याच्या पदार्थातील केचप तसेच शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्यांचे वापरानंतर काय होते ? कारण या वस्तू फेकून दिल्यानंतर त्यांचे कचऱ्यात रूपानंतर होते. परंतु या वस्तूवर पुर्नप्रक्रिया करता आली तर ? परंतु खूप कमी लोक याबाबत विचार करत असतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचतेच परंतु मानवालाही याचे परेनं दिसू लागतात.

गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या एकता यांनी या जुन्या काचेच्या तसेच प्लास्टिक च्या बाटल्यांचा घर सजावटीसाठी तसेच वापरासाठी उपयोग करवून घेतला आहे. त्यामध्ये डॉक्युमेंट फाईल, बुक होल्डर, प्लॅन्टर, दागिने यासारख्या वस्तू तयार केल्या आहेत.

मी तेव्हा बॉम्बेमध्ये जाहिरात क्षेत्रात काम करीत होते. त्यानंतर मी काचेच्या बाटल्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रासंबंधी माहिती मिळवली. त्यासाठी मी एक वर्षासाठी यूके गेले. आणि परत आल्यानंतर माझ्या मूळ गावी वडोदरामध्ये स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला. सन 2010 मध्ये, मी वॉक्सकी वर्क्स – हि कंपनी स्थापन केली, ज्या अंतर्गत सध्या काचेच्या माध्यमातून वस्तू तयार करण्याचे ठरविले. काही दिवसानंतर लक्षात आले कि, शहरात प्लास्टिक तसेच इतर बाटल्यांचा खच पडलेला असतो. त्याचा उवयोग करण्याचे ठरविले. मग मी कचऱ्यातून मिळणाऱ्या काचेच्या माध्यमातून उत्पादन च्यायला सुरवात केली, असे त्या सांगतात.

सन 2014 मध्ये, आम्ही पहिले पुर्नप्रक्रिया केलेले उत्पादन विकले आणि 2017 पासून आम्ही केवळ पुर्नप्रक्रिया उत्पादनांची विक्री करीत आहोत. अशा पद्धतीने त्यांनी इतरही वस्तूंचे उत्पादन केले असून पर्यावरण पूरक गोष्टीचा वापर करण्याबाबत त्या जनजागृती करीत आहेत.

साभार : वेस्ट वॉरियर्स ऑफ इंडिया

 

LEAVE A REPLY

*