एल्गार परिषद : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी थर्टी फर्स्टला येणार पुण्यात!

0

गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी हे नव्या वर्षात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत.

31 डिसेंबरला पुण्यात शनिवारवाड्यावर ‘एल्गार परिषद’चे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद उपस्थित राहणार आहे.

आमदार जिग्नेश मेवाणी यांचा हा दौरा राज्यातील प्रस्थापित दलित नेत्यांना आव्हान देणारा ठरणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे.

प्रस्थापित दलित नेते मात्र त्यास फारसे महत्त्व देत नसल्याचे सांगत आहेत.

जिग्नेश आला तर त्याचे स्वागत आहे, पण तेढ निर्माण होऊ नये ही खबरदारी घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

राज्यात रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, आनंद आंबेडकर, जोगेंद्र कवाडे असे अनेक नेते सध्या दलितांचे नेतृत्त्व करतात.

LEAVE A REPLY

*