गुजरातच्या भक्ताकडून शनिचरणी 19 लाखांचा कलश अर्पण

0

51 तोळे सोने व सव्वाचार किलो चांदीचा वापर

सोनई (वार्ताहर) – गुजरातच्या अहमदाबाद येथील एका शनिभक्ताने काल बुधवारी सुमारे 19 लाख रुपये किमतीचा सोनं व चांदी असणारा कलश शनिचरणी अर्पण केला. 51 तोळे (510 ग्रॅम) सोनं व 4 किलो 290 ग्रॅम चांदीपासून हा कलश बनवण्यात आला आहे. या भक्ताने आपले नाव सांगितले नाही. सायंकाळच्या महाआरती नंतर हा कलश चौथर्‍यावर लावण्यात आला.

या शनिभक्ताचा शनैश्‍वर देवस्थानच्या वतीने विश्‍वस्त अप्पासाहेब शेटे यांनी जनसंपर्क कार्यालयात सन्मान केला. देवस्थानच्यावतीने विश्‍वस्तांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनिप्रतिमा देऊन सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना या शनिभक्ताने सांगितले की शनी दर्शनाने नेहमी एक समाधान मिळते व ऊर्जा निर्माण होत असते. मी गेल्या 15 वर्षांपासून शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी येत आहे. देवस्थानने शनिभक्तांना अत्यंत चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच अनेक सामाजिक कामात हे देवस्थान अग्रेसर असल्याचे दिसत आहे.
यावेळी उपाध्यक्ष नानासाहेब बानकर, विश्‍वस्त रावसाहेब बानकर, भागवत बानकर, दीपक दरंदले, उप कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, व्यवस्थापक संजय बानकर, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*