आंदोलनादरम्यान तोडफोड प्रकरणी हार्दिक पटेल दोषी

0

गुजरात : तीन वर्षांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान विसनगर मतदारसंघाचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याबद्दल हार्दिक पटेल यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

हार्दिक यांच्यासह लालजी पटेल आणि ए. के. पटेल यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. विसनगर कोर्टाने याबाबतची सुनावणी केली. या दोषींना दोन वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण 17 लोकांवर खटला दाखल करण्यात आला होता. विसनगर पोलिसांनी या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यापैकी 14 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

2015मध्ये सुरू झालेल्या पाटीदार आरक्षण आंदोलनादरम्यान हार्दिक पटेल आणि इतर पाटीदार नेते विसनगरचे तत्कालीन आमदार ऋषिकेश पटेल यांना आपल्या मागण्यांचे पत्रक देण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्यासह पाच हजार लोकांचा जमावही होता.

LEAVE A REPLY

*