Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आचारसंहितेच्या पेचात नाशिक तलाठी निवड यादी

Share

नाशिक । प्रतिनिधी

तलाठी पदांसाठी घेतलेल्या भरती परीक्षेची निवड यादी आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधल्या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे निवड यादी जाहीर केल्यास आचार संहितेचे उल्लंघन होता काम नये ,या पेचात प्रशासन आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने त्यासाठी अंशकालीनची यादी देण्यासाठी महाऑनलाईनला पत्र दिले असून, त्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

राज्य शासनाने निवडणुकीपुर्वी तलाठी पदासाठीही भरतीची प्रक्रिया राबवली होती. जुलै महिन्यात 83 रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी तब्बल 22 हजारावर उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षे होऊन दोन महिन्यांचा कालवाधी लोटला. विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्या आदल्या दिवशीच महाऑनलाइनकडून ती 20 सप्टेंबरला ती अचानक जिल्हा प्रशासनाला रात्री 11 वाजता प्राप्त झाली. त्यानुसार पुढील एक-दोन दिवसांत जिल्ह्यातील उमेदवारांची यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती.

मात्र, दुसर्‍यास दिवशी दुपारी राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. विधानसभा निवडणूक जाहीर करत आचारसंहिताही लागू झाली. आचारसंहितेची अडचण तर झालीच पण, अंशकालीनच्या पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची माहितीच त्यात प्राप्त झाली नाही. त्यामुळे यादी प्रसिद्ध करता येत नसल्याने त्यांनी प्रथम अंंशकालीनची यादी आता महाऑनलाईनकडे मागितली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!