Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डीत साईबाबा मंदिरावर पारंपारिक पध्दतीने उभारली गुढी

शिर्डीत साईबाबा मंदिरावर पारंपारिक पध्दतीने उभारली गुढी

शिर्डीत साईबाबा मंदिरावर पारंपारिक पध्दतीने उभारली गुढी

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – तिर्थक्षेत्र शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने श्रद्धा सबुरीची गुढी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते उभारण्यात आली. काल बुधवार दि.25 रोजी साईबाबांच्या दरबारात गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा उत्सव पारंपारिक पद्धतीने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

- Advertisement -

सालाबाद प्रमाणे यंदाही साईबाबांच्या मूर्तीला साखरेची गाठी चढवण्यात आली त्याचबरोबर साई मंदिर सुवर्ण कलशावर चांदीचा कलश, वस्त्र, लिंबाचे पाने, पुष्पहार, हारगाठी लावून सजावट केलेली आकर्षक गुढी मंदीराचे मुख्य पुजारी बाळा जोशी यांच्यासह पुरोहितांनी विधीवत पूजाअर्चा मंत्रोच्चार करून साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली डोंगरे यांच्या हस्ते उभारण्यात आली. दरम्यान जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून खबरदारीचा उपाय म्हणून साईमंदीर बंद करण्यात आले आहे

.

मात्र दैनंदिन पूजाअर्चा तसेच साईसंस्थानच्यावतीने नित्यनेमाने साजरा करण्यात येणारे सण उत्सव कोरोनाच्या सावटामुळे साईभक्तांच्या अनुपस्थितीत अगदी साध्या पध्दतीने साजरा होत आहे. मराठी नवीन वर्षाच्या प्रारंभी साई मंदिरावर सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा उत्सव साजरा केला जातो. शिर्डी शहरात घरोघरी साईबाबांच्या श्रद्धा आणी सबुरीची गुढी उभारण्यात आली असून शिर्डीत तसेच देशात आलेल्या जैविक संकटाचा सबुरीने सामना करुया असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मध्यरात्रीनंतर पुकारलेल्या देशातील 21 दिवसाच्या संचारबंदीमुळे शासनास सर्वोतोपरी सहकार्य म्हणून गुढीपाडवा उत्सवाला ग्रामस्थांनी घरात बसून राहाणे पसंत केले .

- Advertisment -

ताज्या बातम्या