Photo Gallery : शोभायात्रा, बाईक रॅली, लेझीम पथकांच्या निनादात पारंपारिक उत्साहात गुढीपाडवा साजरा

0

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये अनेक ठिकाणी गुढीपाडवा पारंपारिक उत्साहात साजरी करण्यात आला. अनेक ठिकाणी शोभायात्रांनी परिसराला पारंपारीकतेचे कोंदण आले होते.

शहरातील प्रत्येक भागात गुढीपाड्व्याचा आनंदोत्सव अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आला. विशेष म्हणजे, हाच उत्साह शहरासह ग्रामीण भागातदेखील दिसून आला.

नववर्षाच्या प्रारंभी राम नामाच्या मंगलमय नामस्मरणाने पुढील सर्व स्वागत यात्रांचा प्रारंभ झाला. या स्वागत यात्रेत चित्र रथ, महिलां व पुरुषांचे ढोल पथक, लेझीम, लाठी-काठी पथक, विविध भजनी मंडळे, धार्मिक व सांस्कृतीक मंडळे तसेच आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहणारा चित्ररथ, त्याच बरोबर मतदार जनजागृती चित्र रथ होता.

यासोबत नवनिर्माण कला क्रिडा व सांस्कृतीक मित्र मंडळ संचलीत ॐ साई पदयात्रा मित्र मंडळातर्फे 12 कि. चांदीचा गणपती रथ होता. युनिव्हर्सल इंग्लिश मिडीयम स्कुल यांच्या तर्फे मतदार जन जागृती करण्यात आली.

या स्वागत यात्रेत श्री. विनयकुमार चुंबळे यांची स्टार विनर 1974 ची मर्सिडीज् कारने नाशिकच्या सांस्कृतीक व धार्मिक प्रतिकांचे प्रदर्शन घडवीले. या तिनही यात्रा मालेगाव स्टॅण्डवर एकत्रित येवुन पाडवा पटांगण, गोदाघाट येथे विसर्जित झाल्या.

सहस्त्रनाद ढोल वादकांचा 40 जणांचा समुह चित्ररथासह सामिल झाला होता. या शिवाय योग विद्याधाम यांचा चित्र रथ व विठ्ठल माऊली भक्त मंडळ यांचा चित्र रथ, दत्त छंद परीवार यांचा चित्र रथ, भारतीय इतिहास संकलन समिती यांचा शिल्पकलानीधी श्री. कृष्णाजी विनयक वझे यांच्या 150 व्या जयंती निमित्त विशेष चित्र रथ व समर्थ रात्र शाखा यांचा चित्र रथ, वेलकम मित्र मंडळाचा मतदार जनजागृती रथ, गजानन महाराज सेवा संस्थान तर्फे राम रथ, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईन्ड तर्फे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शाम पाडेकर व रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुलींचे मल्लखाम प्रात्यक्षिके प्रशिक्षक यशवंत जाधव व लिना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली.

या शिवाय पारंपारीक पोशाख परिधान करून 250 भगिनी मतदार जागृती करीत बाईक रॅलित सहभागी झाल्या होत्या. शाटोकोन कराटे यांच्या तर्फे आत्मसंरक्षणार्थ विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या शिवाय विविध महिलां द्वारे कथ्थक, मंगळागौर, गरबा सादर करण्यात आला. किर्ती शुक्ल यांच्या नृत्यानंद संस्थे द्वारे गणेश वंदना व तराना सादर करण्यात आला.

नाशिक छायाचित्रकार संघटना प्रमुख संजय जगताप यांच्या मार्गदर्शना खाली सौरभ अमृतकर, संदिप भालेराव आदी हौशी फोटोग्रॉफर सामिल झाले होते.

या यात्रा यशस्वतेसाठी केतकी चंद्रात्रे,नेहा पाठक, किर्ती शुक्ल, प्रियंका लोहीते, सिद्धेश खांदवे, नयना रुईकर, अनुप्रिता जोशी, शौनक गायधनी, मंदार कावळे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे आदींनी सहभाग घेतला.

नववर्ष स्वागत यात्रेतर्फे जेष्ठ मार्गदर्शक श्री. जयंतजी गायधनी, श्री. प्रफुल्लाजी संचेती, अध्यक्ष श्री. राजेशजी दरगोडे यांनी या यात्रेच्या समारोप प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे व प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणार्‍या सर्वांचे मन:पुर्वक आभार मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी सपट चहा, विक्रम चहा, संह्याद्री फार्म, टी.जे.एस.बी. बँक, निशम डेव्हलपर्स, य.च.मु.विद्यापीठ व सर्व देणगिदारांचे मोलाचे सहकार्य लाभल्या बद्दल त्यांचे धन्यवाद व सर्व कार्यक्रमांना अत्यंत मौलीक प्रसिद्धी दिल्या बद्दल सर्व पत्रकारबंधु व त्यांच्या सहकार्‍यांचे आभार मानले.

वरील सर्व यात्रांचा समारोप पाडवा पटांगण, गोदाघाट येथे करण्यात आला. या सोबतच नव वर्ष स्वागत यात्रा समितीचा 6 दिवसीय संस्कृतीक महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

तसेच सिन्नरमध्ये सकाळी शोभायात्रा निघाली गुढीपाड्व्याचा मुहूर्त सकाळी सूर्योदयापूर्वी असल्यामुळे अनेकांनी सूर्य उगविण्याच्या आताच सर्व घरांवर गुढ्या उभारत मराठी नववर्षाचे स्वागत केले.

गुढीवर नवीन पीस, हार, केशरी रंगाचे वस्र किंवा ध्वज लावण्यात आला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरांनी गुढीपाड्व्याचा उत्सव साजरी होतो. सटाणा, मालेगाव, देवळा आणि कळवण परिसरात पारंपारिक उत्साहात गुढीपाडवा साजरी करण्यात आला.

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त म्हणून गुढीपाड्व्याकडे बघितले जाते.

आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभ देखील करतात.

LEAVE A REPLY

*