Type to search

गुळवंच : पालक सचिवांसमक्ष जनावरे ‘उन्हात’; चारा वाढवून देण्याची मागणी

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गुळवंच : पालक सचिवांसमक्ष जनावरे ‘उन्हात’; चारा वाढवून देण्याची मागणी

Share

सिन्नर | प्रातिनिधी

पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आज सिन्नर तालुक्यात पाहणी करत दुष्काळाचा आढावा घेतला. यावेळी सिन्नर तालुक्यात उभारण्यात आलेल्या छारा छावणीतील जनावरे उन्हात दिसून आले.

छारा छावण्यातील चारा वाढविण्यात यावा, सोयीसुविधा वाढवाव्यात अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. दरम्यान, कुंटे यांनी सांगितले की, माझा पाहणी दौरा आणि चारा छावण्या सुरु होण्याचा काहीही संबंध नसून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आपण दौरा करत असल्याचे स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने छावणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी 30 जून पर्यंत जनावरे छावणीत आणावित असे यावेळी सांगण्यात आले आहे.

गरज भासल्यास छावणीची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनस्तरावर घेतला जाईल असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, छावणी चालकाकडून अडचणींचा पाढा वाचण्यात आला. जनावरांची बारकोड नोंदणी व छावणीत सीसीटीव्ही व्यवस्था शासनानेच करावी अशी मागणी छारा छावणी चालकांनी याप्रसंगी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!