Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery/ Video : संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर विकासासाठी पालक मंत्र्यांनी लक्ष घालावे; वारकरी भाविकांची मागणी

Share
मोहन देवरे | त्र्यंबकेश्वर
संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर विकासासाठी पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी लक्ष घालावे ही प्रमुख येथे आलेल्या वारकरी भाविकांची आहे. मागील शासनाकडून संत निवृत्तीनाथ मंदिर परिसर विकासाठी निधी मिळू शकलेला नाही. या पूर्वी ना. भुजबळ हे मंत्री असतांना मंदिरलगत दर्शनवारी व वारकरी निवास यासाठी शासनाकडून निधी मिळवून दिला होता. आता हे ते वारकरी वर्गाच्या भावना लक्षात घेतील अशी अपेक्षा संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्ट पदाधिकरी यांनी केली आहे.
संत निवृत्तीनाथाचे नाणे काढावे अशी मागणी यात्रेकरू वारकरी करीत आहे. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांचे नाणे चलनात आहे. या सारखेच नाणे संत निवृत्तीनाथाचे हवे अशी सूचना भाविकांकडून आली आहे. संत विद्यापीठ शाखा त्र्यंबकेश्वरला काढावी अशी जुनी मागणी अभ्यासु वारकरी यांनी केली आहे. संत निवृत्तीनाथाचे काही ग्रंथ धुळे येथील वाचनालयात असल्याचे कळते त्याचा ग्रंथ संपदेचा शोध व्हावा अश्या मागण्या असून यात लक्ष घालावे.
(छाया / व्हिडीओ : सतीश देवगिरे)
नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गाचे चौपदरीकरण ना. छगन भुजबळ यांचे काळात झाले तेंव्हा नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर दुतर्फा वारकरी भविकसाठी फुटपाथ दिंडी मार्ग काढावा असे नियोजन होते. प्रत्यक्षात मागील पाच वर्षात याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही. दिंडी मार्ग व्हावा अशी मागणी आता जोर धरत आहे.  श्रावण मास प्रदक्षिणा उटीची वारी साई पालख्या यांची वर्दळ वर्षभर असते. तेव्हा येथे दिंडीची मागणी रास्त आहे. आता भुजबळ यांनी पालकमंत्री या नात्याने लक्ष घालावे अशी मागणी आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वरमध्ये आल्या नंतर कुशावर्तावर गोदावरीला वंदन करून दिंड्या संत निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ मंदिरात हजेरी लावत आहे. हभप संदीप जाधव, मोहन जाधव, सुरेश भोर, करमरकर महाराज, नवनाथ महाराज, स्वामी दिव्यानंद महाराज इ. वारकरी तसेच तेजस दुसाने, वेदांत विसपुते, युगंधर देवरे या भाविकांनी ह्या वरील मागणी केली आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांचे चांदीची प्रतिमा नाणे रुपात ना नफा ना तोटा या पद्धतीने काढावे अशी सूचना हिमांशू देवरे यांनी संत निवृत्तीनाथ मंदिर ट्रस्टला केली आहे
Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!