Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नावंदे यांची सोय करताना जिल्ह्याची गैरसोय नको

Share

कारवाई होणारच : पालकमंत्री शिंदे यांची कठोर भूमिका

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर यांची सोय करताना जिल्ह्याची गैरसोय करता येणार नाही, अशा शब्दांत पालकमंत्री राम शिंदे यांनी नावंदे यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली. जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्या विरोधात क्रीडा संघटनांनी सुरू केलेले आंदोलन, त्याच्या झालेल्या तक्रारी आणि त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागणे आदीबाबत बुधवारी पालकमंत्री राम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, नावंदे यांच्याबाबत बर्‍याच गंभीर तक्रारी आहेत. त्यांच्या वागण्यामुळे शालेय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्या.

तसेच इतर तक्रारींबाबत क्रीडा संघटनांनी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळासमवेत मी देखील होतो. तेथे झालेल्या चर्चेनुसार आणि तक्रारीचे गंभीर स्वरूप लक्षात घेता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या काळात त्यांची चौकशी केली जाईल. चौकशीनंतर त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नावंदे यांचे पती देखील नगरमध्येच नोकरीस आहेत. पती-पत्नी एकत्रीकरणात त्यांची नगरला नियुक्ती झाल्याकडे लक्ष वेधले असता, त्यांच्या पतीचीही सोय करू, असे पालकमंत्री शिंदे म्हणाले. तसेच नावंदे यांची सोय पाहताना जिल्ह्याची गैरसोय होऊन चालणार नाही, अशी कठोर भूमिकाही त्यांनी घेतली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!