कर्जमुक्तीनंतर टिका करण्यास मुद्दाच नसल्याने विरोधकांकडून समृध्दी महामार्गाचे राजकारण

0

पालकमंत्री राम शिंदेः शिर्डीत भाजपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा

शिर्डी (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरहीत तीन वर्षे देशाचा कारभार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने पुढे नेण्याचे काम केले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतीक पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करू शकला आहे.

देशाप्रमाने राज्यातही देंवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभार करून सर्वसामान्य जनतेचा विश्वास दोन वर्षात संपादन केला असुन शेतकर्‍यांसाठी कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने आता विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक नसल्याने शेककर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच समृध्दी महामार्गाचे राजकारण करित असल्याची टिका जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर आरूढ होण्याला तीन वर्ष झाल्याबद्दल सबका साथ सबका विकास हे ब्रिद वाक्य घेवून जिल्हा भाजपाचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा शिर्डी येथे पार पडला. या मेळाव्यात प्रा. राम शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.भानुदास बेरड होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ.स्नेहलता कोल्हे, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सचिन तांबे, माजी खा.भाउसाहेब वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, नगरसेविका वंदना गोंदकर, शिर्डी शहर भाजपाचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर,

जालिंदर वाकचौरे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तीन वर्षात घेतलेल्या कामांचा आढावा घेताना सांगितले की, स्वांतंत्र्यांनंतर देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेवून विकासाच्या योजना लोकांच्या घराघरात पोचविण्याचे काम केले आहे.

देशाला आर्थीक महासत्ता बनविण्यासाठी मेक इन इंडिया, डिजीटल इंडीया, स्टार्ट ऑफ इंडिया या सारख्या असंख्य योजनांची सुरवात केली. जागतीक पातळीवर भारताचा दबदबा वाढविण्यासाठी मोठी मेहनत घेतली. सबका साथ सबका विकास करण्याची घोषणा करून ती प्रत्याक्षात कृतीत उतरवली. केंद्र व राज्स सरकारने गेल्या तीन वर्षात केलेले काम लोकांपुढे नेण्याचे काम यापुढे कार्यकर्त्यांनी करावे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहोरात्र काम करून सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या हिताचे निर्णय घेत आहेत.

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षांना राजकारण करायचे होते. त्यासाठी त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. पण मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांची कर्जमाफी करून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून दिला. राज्यात सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आता काही लोकांनी औंरगाबादला बैठ्ठक घेवून शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. समृध्दी मार्गाचे आता राजकारण सुरू केले आहे. गेल्या पंधरा वर्षात राज्यात निर्माण होणारी विज बाहेर विकून राज्यातील जनतेला विजेच्या भारनियमनात लोटले.

आणी आता शेतकर्‍याविषयी खोटा कळवळा दाखवायला सुरवात केली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर एकही विजेचा प्रकल्प न उभारता राज्य भारनियमन मुक्त करून दाखवण्याची किमया मुख्यमंत्री फडनवीस यांनी केली आहे. देशात मोदी व राज्यात फडणवीस सरकारने सुरू केलेल्या जनकल्यानाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन ना. शिंदे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, भाजपाचे शिर्डी शहर अध्यक्ष शिवाजी गोंदकर यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन संतोष खेडलेकर यांनी केले.

देशात नरेंद्र मोदींच्या व राज्यात देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखाली अच्छे दिनाची सुरवात झाली आहे. खर्‍या शेतकर्‍यांसाठीच मुख्यमंत्री कर्जमाफी देणार आहेत. कर्जमाफीचे राजकारण करणार्‍या काँग्रेस राष्ट्रवादीचे राजकारणाला मुख्यमंत्र्यांनी ब्रेक दिला आहे. आता अच्छे दिन शेतकरी व सामान्य जनतेला येणार असुन बुरे दिन विरोधकांना येणार आहेत.
– बबनराव पाचपुते,माजी आमदार

गत पंधरा वर्षात शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलेल्या विरोधकांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी आंदोलनाचे राजकारण करून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते.मात्र मुख्यमंत्री फडणविस यांनी पणतांब्याच्या शेतकर्‍यांशी थेट संवाद साधुन शेतकर्‍यांचा प्रश्न दोन तारखेच्या मध्यरात्रीच सोडवला होता. परंतू विरोधकांनी शेतकर्‍यांना भडकावून देत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. -आ. स्नेहलता कोल्हे

 

LEAVE A REPLY

*