जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित : ना. शिंदे

0
अकोले (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेला नियमानुसार निधी दिला आहे मात्र दिलेला निधी अखर्चित रहात असल्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मवेशी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तालुक्यातील मवेशी येथे शिवार सवांद कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा .शिंदे अकोले तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी नंतर पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री यांना जि. प. चा निधी कपात केल्याचा आरोप केला होता. तसेच भाजप चे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी जिल्हा परिषदेचे जलयुक्त अभियान योजनेकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते.
मुक्त जाती जमाती मंत्री पदाचा नवीन कार्यभार स्वीकारला आहे. या खात्यासाठी स्वतंत्र 51 अधिकारी नियुक्त केले आहेत.सचिव पदी राधिका रस्तोगी यांची नियुक्ती केल्याचे सांगत पूर्वी सामाजिक न्याय विभागाकडे हे खाते होते ते पूर्णतः वेगळे केले आहे. दोन हजार 384 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या खात्याची स्वतंत्र कार्यालये सुरु झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
सात बारा सदरी असणारे राज्यामध्ये 1 कोटी 36 लाख शेतकरी आहेत. त्यात पीक कर्ज असणारे 63 लाख शेतकरी असून त्यातील 31 लाख थकीत आहेत.कर्जमाफी बाबत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने सर्व समावेशक यादी केली आहे.
गरजू व अडचणीत असणार्‍या शेतकर्‍यांचे कर्ज माफ होईल. त्यासाठी शासनाला कितीही रक्कम उपलब्ध करावी लागली तरी शासनाची तयारी असल्याचे ते म्हणाले. अल्प भूधारक शेतकर्‍यांसंदर्भात परिपत्रक यायला वेळ लागेल मात्र त्यांना तातडीने कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी सांगितले.

शासन दारिद्यरेषेची व्याख्या बदलविणार असे सांगून आर्थिक निकष हा मुद्दा त्यात ठेवला जाणार आहे. नांगर धरणार्‍याला सहा लाखाचे उत्पन्न असे निकष निश्चित करणार आहे. तालुक्यातील आंबित व पेढेवाडी येथील डोंगराच्या कडेला असणार्‍या आदिवासी कुटुंबाला धक्के बसण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना पाहणी अधिकार्‍यांच्या आदेशाबाबत संधिग्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*