‘लष्कर’ला जमीन देण्यास विरोध करणार : पालकमंत्री

0

जिल्हाधिकार्‍यांकडून जाणून घेतली माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर, राहुरी आणि पारनेर तालुक्यांतील 27 गावांतील हजारो हेक्टर सरकारी जमीन लष्काराला हस्तांतरण करण्याची चर्चा शासन पातळीवर सुरू आहे. मात्र, ही जमीन देण्यास पालकमंत्री या नात्याने योग्य ठिकाणी विरोध करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सोमवारी दिली. 

सोमवारी सकाळी मंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडून लष्कराला जमीन हस्तांतरणाचा विषय समजून घेतला. यावेळी आ. शिवाजी कर्डिले, आ. विजय औटी उपस्थित होते. यापूर्वी जिल्ह्यात लष्काराला किती जमीन देण्यात आलेली आहे?

आता लष्काराकडून किती मागणी करण्यात आली याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. त्यानंतर दुपारी पत्रकारांशी पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते. लष्काराला प्रस्तावित जमीन हस्तांतरणास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोमवारी सकाळी मंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडून लष्कराला जमीन हस्तांतरणाचा विषय समजून घेतला. यावेळी आ. शिवाजी कर्डिले, आ. विजय औटी उपस्थित होते. यापूर्वी जिल्ह्यात लष्काराला किती जमीन देण्यात आलेली आहे? आता लष्काराकडून किती मागणी करण्यात आली याबाबत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. त्यानंतर दुपारी पत्रकारांशी पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते. लष्काराला प्रस्तावित जमीन हस्तांतरणास विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची सहकार खात्याकडून चौकशी सुरू आहे. नोकर भरती ही पारदर्शकपणे झाली पाहिजे. पात्र उमदेवारांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे, असे मत ना. शिंदे यांनी व्यक्त केले. कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत शिंदे म्हणाले, कर्जमाफीची प्रक्रिया पादर्शक करण्यासाठी ग्रीन लिस्ट तपासून निर्णय घेण्यात येणार आहेत. सरकारने सहकार आयुक्तांच्या खात्यावर 13 हजार 82 कोटी रुपये वर्ग केलेले आहेत.

 रस्ते दुरुस्तीसाठी कोर्टाची वेळ  येणार नाही – जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला रस्ते दुरुस्तीच्यानिधी संदर्भात सदस्यांना कोर्टात जाण्याची वेळ येणार नाही. जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार यांनी मला जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यानुसार समन्वयातून या निधीचे वितरण करणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*