Friday, May 3, 2024
Homeनाशिकबिटकोतील बालरूग्ण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

बिटकोतील बालरूग्ण कक्षाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत (Corona third wave) बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात (Bytco Hospital) नुतन चाईल्ड वार्डची उभारणी करण्यात आली आहे…

- Advertisement -

या चाईल्ड वार्डला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी भेट देवून पाहणी केली.

यावेळी आ. सरोज अहिरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, चाईल्ड वार्डच्या प्रमुख डॉ.कल्पना कुटे, डॉ. आवेश पलोड उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ‘चाईल्ड वार्डची’ रचना व चित्रांची रंगसंगती उत्तम आहे. या वार्डात एकूण शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

आवश्यक असलेल्या व्हेंटीलेंटरची देखील सुविधा येथे उपलब्ध असून सर्व सुविधांनी युक्त असे चाईल्ड वार्ड असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी भुजबळ यांचे हस्ते यावेळी सिटी स्कॅन मशिनचे उदघाटन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या