जीएसटीतील 66 वस्तूंच्या करात कपात

0

जीएसटी परिषदेने रविवारी झालेल्या बैठकीत 66 वस्तूंवरच्या करात बदल करून ते कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेषतः शेतीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरच्या सुट्ट्या भागांवरील कर 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर आणण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 जीएसटीचे जुने आणि नवीन दर

  • संगणक प्रिंटरवर 28 टक्क्यांऐवजी आता 18 टक्के
  • काजूवरचा कर 18 वरून 12 टक्के
  • 100 रुपयांवरील सर्व सिनेमा तिकिटांवर 28 टक्के, तर 100 रुपयांखालील तिकिटांवर 18 टक्के कर
  • टेलिकॉम क्षेत्रावरील 18 टक्के कर कायम
  • कटलरीवरील कर 18 टक्क्यांवरून 12 टक्के
  • इन्सुलिनवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के
  • स्कूल बॅगवरील कर 28 टक्क्यांवरून 18 टक्के
  • अगरबत्तीवरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के

LEAVE A REPLY

*