जीएसटीच्या कक्षेत रिअल इस्टेट!

0
नवी दिल्ली – रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वाधिक कर चोरी होत असल्याने हे क्षेत्र वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. यासंदर्भात निर्णय 9 नोव्हेंबर रोजी होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. जेटली सध्या अमेरिका दौर्‍यावर असून हॉर्वर्ड विद्यापीठात भारतातील कर सुधारणा या विषयावर व्याख्यान देताना जेटली यांनी हे संकेत दिले आहेत.
भारतात रिअल इस्टेट हे असे क्षेत्र आहे जेथे मोठ्या प्रमाणावर रोकड निर्माण होते आणि करचुकवेगिरीचे प्रमाणही जास्त आहे, असे असूनही हे क्षेत्र अजूनही जीएसटी कक्षेबाहेर आहे. काही राज्ये यावर जोर देत असून माझे वैयक्तिक मतही रिअल इस्टेट जीएसटीच्या कक्षात हवे असेच असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे. यासंदर्भात दोन मतप्रवाह असून याचमुळे त्यावर पुढील बैठकीत चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. रिअल इस्टेट क्षेत्र जीएसटीच्या कक्षेत आणल्यास ग्राहकांना त्याचा फायदा होईल, असा दावाही जेटली यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*