जीएसटी हा करप्रणालीत सुधारणा करणारा कायदा – मुनोत

0
अकोले (प्रतिनिधी) – जीएसटी हा करप्रणालीत सुधारणा करणारा कायदा असून आजपर्यंतच्या कर पद्धतीतील सर्वात मोठा बदल आहे. कोणताही बदल हा सुरुवातीला त्रासदायक वाटत असतो मात्र कालांतराने तो अंगवळणी पडतो असेच जीएसटी च्या बाबतीतही होणार आहे असे प्रतिपादन सीए स्वप्निल मुनोत यांनी केले. जीएसटी मुळे कर चोरीला आळा बसेल असे सांगताना जीएसटी हा व्हॅट सारखाच कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरी क्लब अकोले व ई थ्री इन्स यांच्या सयुंक्त विद्यमाने बुधवारी सायंकाळी येथील जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात सीए स्वप्निल मुनोत यांचे जीएसटी या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल वैद्य व्यासपीठावर उपस्थित होते.
मुनोत हे मूळ अकोलेचेच असून सीए झाल्यानंतर पुणे येथे स्थायिक झाले आहेत. जीएसटी संदर्भात त्यांचे हँडबुक ऑन जीएसटी फॉर बिगिनर्स हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
डॉ.साहेबराव वैद्य, राम पन्हाळे,डॉ.प्रकाश सारडा,अरुण नवले, अक्षय भळगट, दत्तात्रय वाळुंज आदींनी जीएसटीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना मुनोत यांनी उत्तर दिले. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन आयटीआय चे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वकील बाळासाहेब वैद्य यांनी करून दिला तर आभार जाणता राजा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन शेटे यांनी मानले.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे भाऊसाहेब नाईकवाडी, सतीश बुब, रामनिवास राठी, दिलीप शहा, प्रकाश लोढा, राजेंद्र पुंड, विजय बुब, विजय गुंदेचा, शैलेश मुनोत, सुरेश शहा, संजय हासे, मुस्ताक शेख, मारुती भिंगारे, अशोक सावंत, वृषभ भळगट, मेहुल शहा, देविदास धुमाळ, युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे अनिल वाकचौरे, एडीसीसी बँकेचे बाळासाहेब कोटकर,
शाखाधिकारी मिलिंद नवले, शांताराम धुमाळ, जनलक्ष्मी पतसंस्थेचे आत्माराम रंधे, दुधगंगा पतसंस्थेचे अशोक शिंदे आदींसह तालुक्यातील व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब व ई थ्री इन्सचे पदाधीकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*