GST : 15वी बैठक : सोने- चांदीवरील टॅक्‍स रेट निश्चित होणार

0
जीएसटी परिषद शनिवारी आपल्‍या 15व्‍या बैठकीत 6 प्रकारच्‍या व्‍यापारी वस्‍तूंवर टॅक्‍स रेट निश्चित करणार आहे.
यात सोने- चांदी आणि इतर मौल्‍यवान धातू, मोती, हिरे आणि अन्‍य ज्‍वेलरी स्‍टोर, इमिटेशन ज्‍वेलरीचा प्रामुख्‍याने समावेश आहे.
इतर वस्‍तूंमध्‍ये टेक्‍सटाइल, बिस्किट, पादत्राणे, विजेवर आधारित कृषी उपकरणे आणि विडी, तेंदूपत्‍ता सामील आहे.
अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱयाने सांगितले की, हँडीक्राफट आणि बायोडिझेलवरील टॅक्‍स रेटही या बैठकीत निश्चित होऊ शकतात.
1 जुलैपासून जीएसटी लागू होण्‍याआधी काउंसिलची ही शेवटची बैठक असेल.

LEAVE A REPLY

*