1 एप्रिलपासून सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ

0
सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच खुषखबर मिळणार
मुंबई : आगामी निवडणुका लक्षात घेत सरकारने सातव्या वेतन आयोगाचे ध्येये धोरण हाती घेतले आहे. सातव्या वेतन आयोगानंतर कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे वेतन आयोगातील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितींनुसार सरकारी कर्मचार्‍यांना कमीत कमी तीन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी अठरा हजार रूपयांची वाढ झाल्याने किमान बेसिक एकवीस हजार रूपये होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता सरकार सातवे वेतन लवकर मंजूर करण्याची शक्यता आहे. यामुळे सुमारे लाखो कर्मचार्‍यांना आणि परिवारांना आनंदाची बातमी मिळणार आहे.

याचा फायदा कर्मचार्‍यांना एप्रिल 2018 पासून मिळण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांनी किमान वेतन 18,000 हून 26,000 करण्याची मागणी केली आहे. अर्थमंत्री अरूण जेटली मध्य स्तरापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या कर्मचार्‍यांना अधिक फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. असे एका अधिकार्‍याने सांगितले आहे. मध्यम स्तरावरील कर्मचार्‍यांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे.

LEAVE A REPLY

*